State Fish of Maharashtra: 'सिल्वर पापलेट' महाराष्ट्राचा राज्यमासा म्हणून ओळखला जाईल- मंत्री सुधीर मुनगंटीवार यांची माहिती
पापलेट हा मासा परकीय चलन मिळवून देणारा आहे. त्यामुळे चवीसोबतच आर्थिक दृष्ट्यादेखील त्याचं मह्त्त्व विशेष आहे.
'सिल्वर पापलेट' महाराष्ट्राचा राज्यमासा म्हणून ओळखला जाईल अशी माहिती आज मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली आहे. सातपाटीमधील मच्छीमार सहकारी संस्थांनी याबाबत सुधीर मुनगंटीवार यांची भेट घेऊन त्याबद्दल मागणी केली होती ती आता पूर्ण झाली आहे. पापलेटला महाराष्ट्राचा राज्य मासा म्हणून घोषित केल्यास या अधिकृत मत्स्य प्रजातीच्या अधिवासाचे संरक्षण करण्यासोबतच सागरी पर्यावरणाचा समतोल राखण्यास मदत होईल. असं त्यांच्याकडून सांगण्यात आले होते.
पहा ट्वीट
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)