Shivaji Park Deepotsav 2023: मनसे कडून आयोजित दीपोत्सवाचं यंदा उद्घाटन सलीम-जावेद यांच्या हस्ते
सलीम जावेद या जोडगोळीने हिंदी सिनेसृष्टीला शोले, दीवार, त्रिशूळ सारखे दमदार आणि सुपरहीट सिनेमे दिले आहेत.
मनसे कडून आयोजित शिवाजी पार्क दीपोत्सवाचं यंदा उद्घाटन सलीम-जावेद यांच्या हस्ते होणार आहे. 9 नोव्हेंबर दिवशी वसूबारस या दिवाळीच्या दिवसातील पहिल्या सणाचा मुहूर्त साधत हा दीपोत्सव खुला केला जाईल. तिन्ही सांजेला शिवाजी पार्कचा परिसर आकर्षक रोषणाईने झगमगतो. वसूबारस पासून सुरू होणारा हा दीपोत्सव तुळशीच्या लग्नापर्यंत सुरू असतो. दरवर्षी सेलिब्रिटींच्या हस्ते रोषणाई सुरू केली जाते. यंदाही या सोहळ्याला बॉलिवूडचे सेलिब्रिटी हजेरी लावणार असल्याचं पहायला मिळणार आहे. Diwali 2023 Invitation Cards in Marathi: दिवाळीच्या निमित्ताने आप्तेष्ट, मित्रमंडळींना WhatsApp Messages, SMS द्वारा फराळाचं आमंत्रण देण्यासाठी खास मराठमोळे नमुने .
पहा ट्वीट
#मनसे_दीपोत्सव_२०२३ pic.twitter.com/pswN04l68B
— MNS Adhikrut - मनसे अधिकृत (@mnsadhikrut) November 7, 2023
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Nov 08, 2023 11:25 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

