शिवभक्तांनी पावसाळ्यामध्ये गड पायी चढणे टाळावे, संभाजीराजे यांचे आवाहन

कोविडच्या पार्श्वभूमीवर पर्यटकांसाठी बंद असणारा दुर्गराज रायगड नुकताच रायगड जिल्हा प्रशासनाने सुरू केलेला आहे. मात्र रायगडावर पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे गडचढणीच्या मार्गावर मोठमोठे दगड कोसळत आहेत.

Sambhajiraje Chhatrapati | (Photo Credits: Facebook)

कोविडच्या पार्श्वभूमीवर पर्यटकांसाठी बंद असणारा दुर्गराज रायगड नुकताच रायगड जिल्हा प्रशासनाने सुरू केलेला आहे. मात्र रायगडावर पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे गडचढणीच्या मार्गावर मोठमोठे दगड कोसळतात. तसेच पाण्याचा तीव्र प्रवाह पायरी मार्गावरून वाहत असतो. अशा परिस्थितीत गड पायी चढणे अत्यंत धोकादायक होऊ शकते. हे दगड हटविण्याचे काम प्राधिकरणाच्या वतीने सुरूच आहे. तथापि, सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून शिवभक्तांनी पावसाळ्यामध्ये गड पायी चढणे टाळावे, असे आवाहन संभाजी राजे यांनी केले आहे. फेसबूक पोस्ट-

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement