Sanjay Raut On BJP: काँग्रेस नसती तर भाजपवाले ब्रिटीशांची गुलामी करत असते- संजय राऊत

काँग्रेस नसती तर काय घडले असते हे भाजपवाले केव्हाही समजू शकत नाही. ते त्यांच्या डोक्याबाहेरचे आहे. पण काँग्रेससोबत अनेक मतभेद असले तरी आम्ही हे नक्की सांगू शकतो की, काँग्रेस नसती तर देशाला स्वातंत्र्य मिळाले नसते, पाकिस्तानचे दोन तुकडे झाले नसते, आपण तंत्रज्ञान आणि विज्ञानामध्ये प्रगती केली नसती.

Sanjay Raut | (Photo Credits: ANI)

काँग्रेस नसती तर काय घडले असते हे भाजपवाले केव्हाही समजू शकत नाही. ते त्यांच्या डोक्याबाहेरचे आहे. पण काँग्रेससोबत अनेक मतभेद असले तरी आम्ही हे नक्की सांगू शकतो की, काँग्रेस नसती तर देशाला स्वातंत्र्य मिळाले नसते, पाकिस्तानचे दोन तुकडे झाले नसते, आपण तंत्रज्ञान आणि विज्ञानामध्ये प्रगती केली नसती. काँग्रेस नसती तर भाजप आणि भाजपतील आजचे देवेंद्र फडणवीस, नरेंद्र मोदी आणि अमित शाहदेखील ब्रिटीशांची गुलामीच करत असते.. कारण काँग्रेस नसती तर काय या गोष्टी त्यांना कधीही कळणार नाहीत. ते देशासाठी कधीही विचार करत नाहीत, ते केवळ उद्योगपतींसाठी काम करत असतात, असा हल्लाबोल शिवसेना (UBT) खासदार संजय राऊत यांनी केला.

व्हिडिओ

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now