शिवसेना (UBT) पक्षप्रमुख Uddhav Thackeray रिलायन्स रुग्णालयात अँजिओप्लास्टी झाल्यानंतर मातोश्रीवर परतले, पहा व्हिडिओ (Watch)
उद्धव ठाकरे मंगळवारी, अँजिओप्लास्टी झाल्यानंतर मुंबईतील त्यांच्या 'मातोश्री' निवासस्थानी परतले आहेत. ठाकरे यांच्यावर सर एचएन रिलायन्स रुग्णालयात अँजिओप्लास्टी झाली होती.
Uddhav Thackeray Returns To Matoshree After Angioplasty: महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना (यूबीटी) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मंगळवारी, अँजिओप्लास्टी झाल्यानंतर मुंबईतील त्यांच्या 'मातोश्री' निवासस्थानी परतले आहेत. ठाकरे यांच्यावर सर एचएन रिलायन्स रुग्णालयात अँजिओप्लास्टी झाली होती. वृत्तानुसार, ठाकरे यांना सोमवारी हृदय तपासणीसाठी एचएन रिलायन्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. ठाकरेंच्या तब्येतीबद्दल अपडेट देताना, आदित्य ठाकरे यांनी X वर एका पोस्टमध्ये सांगितले होते की, ही तपासणी पूर्वनियोजित होती. त्यांच्या हृदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या धमनीमध्ये अडथळे निर्माण झाल्याचे अँजिओग्राफीतून समोर आले होते. त्यानंतर तात्काळ अँजिओप्लास्टी करण्यात आल्याचे सांगण्यात आले. आता उद्धव ठाकरे घरी परतले आहेत. ठाकरे यांची प्रकृती सध्या स्थिर असल्याचे वृत्त आहे. (हेही वाचा: Madhukarrao Pichad Hospitalised: मधुकरराव पिचड यांना ब्रेनस्ट्रोक; नाशिक मध्ये उपचार सुरू)
Uddhav Thackeray Returns To Matoshree After Angioplasty:
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)