Shiv Sena On Nawab Malik in Mahayuti: नवाब मलिकांना महायुतीमध्ये सहभागी न करण्याच्या फडणवीसांच्या भूमिकेला शिंदे गटाचा पाठिंबा; पहा Sanjay Shirsat यांची प्रतिक्रिया (Watch Video)
शिवसेनेच्या ठाकरे गटाचे आमदार आणि प्रवक्ते संजय शिरसाट यांनी मीडीयाशी बोलताना 'फडणवीसांची भूमिका योग्यच आहे. असं म्हटलं आहे.
एनसीपी मध्ये फूट पडल्यानंतर नवाब मलिक कुणाचे? हा प्रश्न सातत्याने विचारला जात होता. शरद पवारांसोबत दिसणारे नवाब मलिक आज विधिमंडळाच्या अधिवेशनात सत्ताधारी बाकांवर एनसीपी आमदारांसोबत बसलेले दिसल्यानंतर चर्चांना उधाण आलं होतं. अशात देवेंद्र फडणवीसांनी देखील पत्र लिहून अजित पवारांनी देशद्रोहाचा खटला सुरू असलेल्या नवाब मलिकांना महायुतीमध्ये सहभागी करू नका असं म्हणत आपला आक्षेप नोंदवला आहे. शिंदे गटाकडूनही फडणवीसांच्या भूमिकेचं समर्थन करण्यात आलं आहे. . शिवसेनेच्या ठाकरे गटाचे आमदार आणि प्रवक्ते संजय शिरसाट यांनी मीडीयाशी बोलताना 'फडणवीसांची भूमिका योग्यच आहे. असं म्हटलं आहे. Ajit Pawar On Nawab Malik in Mahayuti: महायुतीत नवाब मलिक नको म्हणणार्या देवेंद्र फडणवीस यांच्या पत्रावर अजित पवार गटाने दिली पहिली प्रतिक्रिया!
संजय शिरसाट यांची प्रतिक्रिया
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)