Devendra Fadnavis on Sharad Pawar: शरद पवार यांनी महाविकास आघाडी सरकार तयार केले म्हणूनचं ते त्यांचा बचाव करत आहेत - देवेंद्र फडणवीस
शरद पवार यांनी महाविकास आघाडी सरकार तयार केले म्हणूनचं ते त्यांचा बचाव करत आहेत, अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.
Devendra Fadnavis on Sharad Pawar: शरद पवार यांनी महाराष्ट्र सरकार तयार केले म्हणूनच ते त्यांचा बचाव करीत आहे. केवळ मुख्यमंत्री व गृहमंत्री यांच्या आदेशानुसार सचिन वाझे यांना पुन्हा सेवेत आणण्यात आले. पवार साहेब सत्यापासून दूर आहेत, अशी प्रतिक्रिया विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. परम बीरसिंग यांच्पूयार्वी महाराष्ट्र डीजी सुबोध जयस्वाल यांनी पोलिस बदल्यांवरील भ्रष्टाचाराबाबत महाराष्ट्र मुख्यमंत्र्यांना अहवाल सादर केला होता. परंतु मुख्यमंत्र्यांनी त्यावर कार्य केले नाही. त्यामुळे डीजी जयस्वाल यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला, असंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)