Sharad Pawar Convoy Accident: पुण्यात शरद पवार यांच्या ताफ्यातील गाडीने दिली दुचाकीस्वाराला धडक; मदत न गेल्याने गाडी पुढे गेली गाडी, व्हिडिओ सोशल मीडीयात वायरल (Watch Video)
धडकेनंतर ताफ्यातील गाडीमधून कोणीही बाहेर आलं नाही आणि दुचाकीस्वाराला मदतही कोणी न केल्याने त्याची चर्चा अधिक होत आहे.
शरद पवार यांच्या ताफ्या मधील एका गाडीची धडक बसल्याने दुचाकीला अपघात झाल्याचा प्रकार समोर आला आहे. पुण्यामध्ये मोदी बाग परिसरामधील घटना आहे. शरद पवार बाहेर पडल्यानंतर त्यांच्या ताफ्यातील गाडीचा धक्का मागून येणार्या एका दुचाकीस्वाराला बसला. सध्या या घटनेचा व्हिडिओ समोर आला आहे आणि वायरल होत आहे. दरम्यान या धडकेनंतर ताफ्यातील गाडीमधून कोणीही बाहेर आलं नाही आणि दुचाकीस्वाराला मदतही कोणी न केल्याने त्याची चर्चा अधिक होत आहे. बाईक चालकाला यामध्ये किरकोळ दुखापत झाली आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)