Belagavi दौरा अद्याप रद्द झालेला नाही; पहा Shambhuraj Desai यांनी बेळगाव दौर्यावर काय दिले अपडेट्स
आज 6 डिसेंबर दिवशी महाराष्ट्राचे मंत्री चंद्रकांत पाटील आणि शंभुराजे देसाई बेळगाव दौर्यावर जाणार होते.
आज 6 डिसेंबर दिवशी महाराष्ट्राचे मंत्री चंद्रकांत पाटील आणि शंभुराजे देसाई बेळगाव दौर्यावर जाणार होते. मात्र कर्नाटक सरकारला जेव्हा कळवलं तेव्हा त्यांनी दोन मंत्र्यांचं कर्नाटकात येणं येथील कायदा व सुव्यवस्थेची स्थिती बिघडवू शकते. असं उत्तर आल्याने आता आम्ही हा दौरा पुढे ढकलत आहोत. अद्याप तो रद्द झालेला नाही. असे Shambhuraj Desai म्हणाले आहेत. आम्ही आमच्या भेटीची तारीख लवकरच ठरवू. बेळगावमध्ये आम्ही मराठी भाषिक लोकांशी बोलू आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना त्या 850 गावांतील मराठी भाषिकांना जे पॅकेज द्यायचे आहे त्यावर चर्चा करू. असेही शंभुराजेंनी स्पष्ट केले आहे.
पहा ट्वीट
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)