Shahnawaz Hussain Health Update: माजी मंत्री शाहनवाज हुसैन यांना Angioplasty नंतर आज हॉस्पिटल मधून सुट्टी; 15 दिवस आरामाचा सल्ला
आज Shahnawaz Hussain यांना हॉस्पिटल मधून डिस्चार्ज देण्यात आला असून पुढे 15 दिवस आराम करण्याचा सल्ला दिला असल्याची माहिती Dr Jalil Parkar यांनी दिली आहे.
माजी केंद्रीय मंत्री शाहनवाज हुसैन यांना मुंबई मध्ये कामानिमित्त आले असताना अचानक 26 सप्टेंबरला अस्वस्थ वाटू लागल्याने लीलावती हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले होते. त्यांच्या हृद्यात ब्लॉक असल्याने तातडीने PRIMARY RCA Angioplasty करण्यात आली. ही शस्त्रक्रिया यशस्वी झाल्याची माहिती देण्यात आली आहे. दरम्यान आज त्यांना हॉस्पिटल मधून डिस्चार्ज देण्यात आला असून पुढे 15 दिवस आराम करण्याचा सल्ला दिला असल्याची माहिती Dr Jalil Parkar यांनी दिली आहे.
पहा ट्वीट
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)