उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत ऊर्जा विभागाचे अनेक सामंजस्य करार; 90 हजार लोकांना मिळणार रोजगार
सुमारे 2.93 लाख रुपयांची गुंतवणूक होणार असून यातून सुमारे 90 हजार लोकांना रोजगार मिळणार आहे.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आज ऊर्जा विभागाचे अनेक सामंजस्य करार पार पडले. फडणवीस म्हणाले, आज आम्ही 3 वेगवेगळ्या प्रकारच्या सामंजस्य करारांवर स्वाक्षरी केली आहे, ज्यामध्ये तरंगते सौर, पवन ऊर्जा आणि ग्रीन हायड्रोजन यांचा समावेश आहे. या सामंजस्य करारांद्वारे 47,000 कोटी रुपयांची गुंतवणूक केली जाईल, 18 हजार लोकांना रोजगार मिळेल आणि सुमारे 5,5000 मेगावॅट वीज निर्माण होईल. त्याचे महत्त्व देखील अधिक आहे कारण ती स्वच्छ ऊर्जा आहे आणि आम्ही विचार केला आहे की 2030 पर्यंत आपण वापरत असलेली 50 टक्के ऊर्जा स्वच्छ ऊर्जा असावी. त्या दिशेने हे एक महत्त्वाचे पाऊल आहे.
आज स्वाक्षरी झालेल्या सामंजस्य करारामुळे पीएसपीद्वारे स्वच्छ आणि हरित ऊर्जेद्वारे 56,000 मेगावॅट वीज निर्मिती केली जाईल. सुमारे 2.93 लाख रुपयांची गुंतवणूक होणार असून यातून सुमारे 90 हजार लोकांना रोजगार मिळणार आहे. फडणवीस यांनी सांगितले, ‘पीएसपी (पम्प्ड स्टोरेज स्कीम) क्षेत्रात आज एका महत्त्वाच्या सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यात आली आहे. 15,000 मेगावॅट वीजनिर्मिती केली जाईल आणि 82,000 कोटी रुपयांची गुंतवणूक केली जाईल आणि सुमारे 18,000 लोकांना रोजगार मिळेल. (हेही वाचा: Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana: राज्यातील महिलांसाठी खुशखबर! 29 सप्टेंबरला मिळणार मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता)
ऊर्जा विभागाचे अनेक सामंजस्य करार-
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)