Schools To Remain Closed in Mumbai: मुंबई, ठाणे, नवी मुंबईला 9 जुलै रोजी अतिवृष्टीचा इशारा; सर्व शाळा राहणार बंद
या इशाऱ्यामुळे, ठाणे, नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील सर्व शाळा बंद राहणार आहेत.
Schools To Remain Closed in Mumbai, Thane and Navi Mumbai: मुसळधार पावसाने देशाची आर्थिक राजधानी मुंबईच्या गतीला ब्रेक लावला आहे. रविवारी रात्रीपासून सुरू असलेल्या पावसामुळे शहरातील विविध भाग जलमय झाले आहेत. यामुळे अनेक मार्ग व उपनगरीय रेल्वे व्यवस्था ठप्प झाली होती. रस्त्यावर पाणी साचल्याने रहदारीही वाढली होती. आता उद्या म्हणजेच 9 जुलै रोजीही मुंबईला अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. या इशाऱ्यामुळे, ठाणे, नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील सर्व शाळा बंद राहणार आहेत. याबाबत नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त कैलास शिंदे व ठाणे जिल्हा शिक्षणाधिकारी यांनी आदेश जारी केले आहेत.
आदेशात म्हटले आहे की, ‘9 जुलै रोजी अतिवृष्टी होणार असल्याबाबत इशारा प्राप्त झाला आहे. त्या पार्श्वभूमीवर, मुलांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनांच्या सर्व शाळा उद्या मंगळवार, 9 जुलै रोजी बंद ठेवण्यात याव्यात.’ यासह ठाणे जिल्हाधिकारी म्हणतात, ‘हवामान विभागाकडून वर्तविण्यात आलेल्या शक्यतेच्या पार्श्वभुमीवर अतिवृष्टीच्या अनुषंगाने इ. 1 ली ते 12 वी च्या सर्व माध्यमाच्या/मंडळाच्या शालेय विद्यार्थ्यांची शाळेत ये-जा करण्याची गैरसोय होऊ शकते. याचा विचार करता शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षितेतेच्या दृष्टीकोनातून जिल्ह्यातील सर्व शाळांना 9 जुलै रोजी सुट्टी जाहीर करण्यात येत आहे.’ (हेही वाचा: Andheri Subway Close: मुंबईत पुन्हा मुसळधार पावसाची हजेरी, अंधेरी सबवे वाहतुकीसाठी बंद)
पहा पोस्ट-
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)