Luxury Car Rams School Bus: आलिशान कारची स्कूल बसला धडक, विद्यार्थी जखमी; चिंचवड येथील घटना (Watch Video)
पिंपरी चिंचवड सायन्स पार्कजवळील बीआरटी लेनवर स्कूल बस आणि कारची धडक झाली. हा अपघात आज (29 जुलै) दुपारी12.30 च्या सुमारास ही टक्कर झाली. ज्यामुळे स्कूल बसच्या समोरील भागाचे मोठे नुकसान झाले. तसेच, काही विद्यार्थी जखमी झाले.
पिंपरी चिंचवड सायन्स पार्कजवळील बीआरटी लेनवर स्कूल बस आणि कारची धडक झाली. हा अपघात आज (29 जुलै) दुपारी12.30 च्या सुमारास ही टक्कर झाली. ज्यामुळे स्कूल बसच्या समोरील भागाचे मोठे नुकसान झाले. तसेच, काही विद्यार्थी जखमी झाले. धडक एवढी तीव्र होती की स्कूल बसच्या समोरील बाजूचे तुकडे तुकडे झाले. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. विद्यार्थ्यांना शाळेत घेऊन जाणाऱ्या या बसमध्ये त्यावेळी 15 मुले होती. या घटनेत दोन मुले जखमी झाली. (हेही वाचा, Tiger Skin Trafficking Racket: वाघाच्या कातड्याची तस्कीर करणारे रॅकेट उद्ध्वस्त; पुणे कस्टमची मोठी कारवाई)
व्हिडिओ
दरम्यान, पोलिसांनी खासगी कार चालकास ताब्यात घेतले आहे. अधिकारी सध्या अपघाताच्या आजूबाजूच्या परिस्थितीचा तपास करत आहेत. या घटनेमुळे कार चालकावर कडक कारवाई करण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे.
व्हिडिओ
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)