Red Alart For Raigad District: रायगड जिल्ह्यातील नंद्यांनी ओलांडली धोक्याची पातळी, जिल्हा प्रशासनाकडून रेड अलर्ट जारी
हवामान विभागाने आज पालघर आणि रायगड जिल्ह्यांसाठी 'रेड' अलर्ट तर ठाणे, मुंबई आणि रत्नागिरीसाठी 'ऑरेंज' अलर्ट जारी केला आहे.
रायगड जिल्ह्यात (Raigad District) गेल्या काही दिवसापासून मुसळधार पावसाने (Heavy Rain) हजेरी लावली आहे. सावित्री नदी, अंबा नदी आणि पाताळगंगा नदीने (Savitri River, Amba River and Patalganga River ) धोक्याचे चिन्ह ओलांडले असून कुंडलिका नदीही धोक्याचे चिन्ह ओलांडण्याच्या मार्गावर असल्याचे रायगड जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. दरम्यान हवामान विभागाने आज पालघर आणि रायगड जिल्ह्यांसाठी 'रेड' अलर्ट तर ठाणे, मुंबई आणि रत्नागिरीसाठी 'ऑरेंज' अलर्ट जारी केला आहे. दरम्यान रायगडमधील शाळांना सुट्टी जाहीर केली आहे.
पाहा पोस्ट -
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)