पावसामुळे रस्ता गेला चिखलात, तरूणाने दुचाकी थेट खांद्यावर घेत गाठला मार्ग ; सातारामधील व्हिडीओ वायरल (Watch Video)
विनय घोरपडे असं या तरूणाचं नाव असून व्हिडीओ मध्ये तो 120 किलो वजनाची मोटारसायकल खांद्यावर घेऊन पावसामुळे खराब झालेल्या शेतातून सुमारे अर्धा किलोमीटर चालत गेल्याचं दिसत आहे.
एरवी प्रवास सुकर करण्यासाठी दुचाकी वर बसून प्रवास केला जातो पण एका वायरल व्हिडिओत चिखलातून तरूण खांद्यावर बाईक घेत चालत असल्याचं दिसत आहे. सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यामधील कुलकजाई गावातील 25 वर्षीय शेतकऱ्याच्या मुलाचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर वायरल झाला आहे. महाराष्ट्रात सर्वदूर पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाल्याचं चित्र आहे.
चिखलाने माखलेल्या रस्त्यावरून तरूण खांद्यावर 120 किलोची दुचाकी घेऊन आला
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)