Satara News: साताऱ्यातील पुसेसावळी हिंसाचार प्रकरणी 23 जणांना अटक
सोशल मीडियावर अज्ञातांनी आक्षेपार्ह मजकूर प्रसारित केल्याने दोन गटात रात्री 9.30 च्या दरम्यान वाद झाला. हा वाद इतका टोकाला गेला की जमाव प्रक्षुब्ध झाला. त्यातून काही ठिकाणी दगडफेकीच्या घटना घडल्या.
सातारा जिल्ह्यातील खाटाव तालुक्यातील पुसेसावळी परिसरात अज्ञातांनी सोशल मीडियावर आक्षेपार्ह लिखाण केल्याच्या कारणावरुन दोन गटात जोरदार वादावादी झाली. त्यातून दोन गटांमध्ये जोरदार राडा झाला. परिणामी पोलिसांनी कायदा व सुव्यवस्थेचा मुद्दा विचारात घेऊन गंभीर पावले
सातारा जिल्ह्यातील पुसेसावळी शहरात सोशल मीडिया पोस्टवरुन दोन गटात राडा झाल्याचा प्रकार घडला. समाजमाध्यमांवर आक्षेपार्ह मजकूर प्रसारित झाल्याच्या घटनेचे रात्री खटाव तालुक्यातील पुसेसावळी येथे तीव्र पडसाद उमटले. यानंतर दोन गट आमने- सामने येत दगडफेकही झाली. यामध्ये एकाचा मृत्यू झाला. या प्रकरणी आता 23 जणांना अटक करण्यात आली आहे. (हेही वाचा - Pune Crime: पुण्यात गणपतीच्या वर्गणीवरून दुकानदाराला मारहाण, घटना कॅमेरात कैद)
सोशल मीडियावर अज्ञातांनी आक्षेपार्ह मजकूर प्रसारित केल्याने दोन गटात रात्री 9.30 च्या दरम्यान वाद झाला. हा वाद इतका टोकाला गेला की जमाव प्रक्षुब्ध झाला. त्यातून काही ठिकाणी दगडफेकीच्या घटना घडल्या. काही ठिकाणी जाळपोळही झाली. लोक आमनेसामने आले. त्यातून पुन्हा काही हिंसक घटना घडल्या. ज्यात चार लोक जखमी झाले. एकाचा मृत्यू देखील झाला होता.
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Sep 12, 2023 03:40 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

