Satara: खासदार Dr Shrikant Shinde आपल्या गावी अनुभवत आहेत 'गावपण'; केली भात लागवड, गाईंना खाऊ घातला चारा (Watch Videos)

डॉ श्रीकांत शिंदे हे सध्या त्यांच्या सातारा जिह्यातील गावी आहेत. या ठिकाणी ते गावपण अनुभवत आहेत.

Satara: खासदार Dr Shrikant Shinde आपल्या गावी अनुभवत आहेत 'गावपण'; केली भात लागवड, गाईंना खाऊ घातला चारा (Watch Videos)
Dr Shrikant Shinde

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र, खासदार डॉ श्रीकांत शिंदे हे सध्या त्यांच्या सातारा जिह्यातील गावी आहेत. या ठिकाणी ते गावपण अनुभवत आहेत. यावेळी त्यांनी भातशेतीत मळ्यात भातरोपे लावली, तसेच गावच्या शेतात गाईंना चारा  खाऊ घातला.

याबाबत लेल्या पोस्टमध्ये ते लिहितात, ‘समाधान आणि सुख या शब्दांचा समानार्थी शब्द फक्त गावचे घर हाच असतो. दिवस वेगाने सरकतात पण अजूनही गावचे घर आठवलं की मग जगण्याची खरी श्रीमंती म्हणजे काय ते समजते. गावच्या शेतीत रमणे आणि गुरावासरांना मायेने जवळ घेणे ही गोकुळश्रीमंती अनुभवताना त्याबद्दल शब्दांत लिहिणे हे कठीण असते. पानापानातुन वाढणारे झाड, भातशेतीत मळ्यात वाढणारी भातरोपं, जिवंत बहरणारा हिरवा डोंगर आणि पावसाचा कणाकणात रुजण्याचा सोहळा हे सगळं पाहणे म्हणजे एक ऊर्जा असते. शेतीत राबताना त्या बळीराजाच्या कष्टाची जाणीव आपल्या हातात असलेल्या जबाबदारीची जाणीव देते. आज भाताची लावणी करताना तीच जाणीव प्रत्येक रोपात होती. गुरंवासरे त्यांचा मुकेपणा, त्यांची माया हे सगळं अबोल असते पण तरीही ते खूप बोलकं असते. हे गावपण अनुभवण्याचा एक वेगळाच आनंद आहे. निसर्गाचं हे देणं जगण्याचा भाग असणं यापेक्षा वेगळं भाग्य नाही.’ (हेही वाचा: Maharashtra Weather Forecast: महाराष्ट्रात पुढचे चार ते पाच दिवस पाऊस वाढीचे- आयएमडी)

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Jul 17, 2023 05:19 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).