Narayan Rane Statement: संजय राऊतांना शिवसेनेला संपवल्याचा आनंद झाला असेल, नारायण राणेंची तीव्र शब्दात टीका

ते म्हणाले की, संजय राऊत खुश आहेत. कारण त्यांना शिवसेनेला सत्तेवरून खाली खेचल्याचा व शिवसेनेला संपवल्याचा आनंद झाला असेल.

Narayan Rane (Pic Credit - ANI)

शिवसेना नेते एकनाथ शिंदेंसह अनेक आमदारांनी बंड पुकारले आहे. यामुळे शिवसेनेमध्ये फुट पडल्याचे चित्र निर्माण झाले आहे. यामुळे मविआ सरकार पडण्याची शक्यता आहे. यावर आता अनेक स्तरातून प्रतिक्रिया येत आहेत. याप्रकरणी नारायण राणेंनी संजय राऊतांवर निशाणा साधला आहे. राणेंनी ट्विटद्वारे राऊतांवर टीका केली आहे. ते म्हणाले की, संजय राऊत खुश आहेत. कारण त्यांना शिवसेनेला सत्तेवरून खाली खेचल्याचा व शिवसेनेला संपवल्याचा आनंद झाला असेल. कपटी, कारस्थानी व दुष्ट बुद्धीच्या माणसाची ही कटकारस्थाने आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement