Sangli Fire: सांगलीच्या पेठनाकाजवळील कारखान्यात भीषण आग; कोट्यावधींचा माल जाळून खाक, जीवितहानी नाही (Video)

या प्लांटचे नुकतेच नूतनीकरण आणि आधुनिकीकरण करण्यात आले असल्याने आगीमुळे झालेले एकूण नुकसान कोटींमध्ये आहे.

Sangli Fire

सांगली जिल्ह्यातील पुणे-बेंगळुरू राष्ट्रीय महामार्ग 48 वर असलेल्या नेर्ले येथे एका खाजगी कंपनीच्या अन्न प्रक्रिया सुविधेत गुरुवारी सकाळी 6 वाजता भीषण आग लागली. शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचे सांगण्यात येत आहे. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या सहा गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. स्प्शाल मिडियावर या आगीची व्हिडीओ व्हायरल होत आहेत, ज्यामध्ये कारखान्यामधून धुराचे लोट बाहेर पडताना दिसत आहेत. कारखाना बंद असल्याने आर्थिक नुकसान सोडता इतर कोणताही अनुचित प्रकार टळला. सांगली एसपीच्या म्हणण्यानुसार कोणतीही जीवितहानी झालेली नाही. या प्लांटचे नुकतेच नूतनीकरण आणि आधुनिकीकरण करण्यात आले असल्याने आगीमुळे झालेले एकूण नुकसान कोटींमध्ये आहे. आग इतकी मोठी होती की प्रवाशांना आणि स्थानिकांना श्वास घेण्यास त्रास होत होता. (हेही वाचा: Oshiwara Fire Breakout: मुंबईतील ओशिवारा परिसरात लाकडी गोदामास आग, अग्निशमन दल आणि पोलीस घटनास्थळी दाखल)

Sangli Fire: 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now