Sandeep Deshpande Attack Case: संदीप देशपांडे यांच्यावरील सीसीटीव्ही फूटेज जारी; पोलिसांची 8 पथकं आरोपींच्या मागावर (Watch Video)
पोलिसांनी शिवाजी पार्क परिसरातील सीसीटीव्ही फूटेज जारी केले आहे. त्यामध्ये आरोपींचे चेहरे स्पष्ट दिसत आहेत.
मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे यांच्यावर काल सकाळी सात-साडेसातच्या सुमारास स्टंपने हल्ला करण्यात आला. या हल्ल्यामध्ये त्यांच्या हाता-पायाला जबर दुखापत झाली आहे. या हल्ला प्रकरणी काल पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेतला आहे. संदीप देशपांडे बीएमसी मधील काही कथित घोटाळे बाहेर काढत होते त्यावरून त्यांच्यावर पाळत ठेवून हा हल्ला झाल्याचा त्यांच्या सहकार्यांचा आरोप आहे. या हल्लाप्रकरणी पोलिसांनी शिवाजी पार्क परिसरातील सीसीटीव्ही फूटेज जारी केले आहे. त्यामध्ये आरोपींचे चेहरे स्पष्ट दिसत आहेत. आता त्यांच्या मागावर पोलिसांची 8 पथकं आहेत.
पहा सीसीटीव्ही फूटेज
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)