Samruddhi Mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर केमिकल घेऊन जाणाऱ्या ट्रकला भीषण आग, टायर फुटून लागली आग (Watch video)

आता केमिकल घेऊन जाणाऱ्या एका ट्रकचा समृद्धी महामार्गावर भीषण अपघात झाला. नाशिक हून नागपुरला जाताना अपघात झाला.

accident pc twitter

Samruddhi Mahamarg Accident: गेल्या काही दिवसांपासून समुध्दी महामार्गावर अपघाताची मालिका सुरुच आहे. अपघातात अनेक नागरिकांनी जीव गेला. बुलढाणा बस अपघातानंतर देखील या महामार्गावर तीन भीषण अपघात झाले. या सगळ्या घटना ताजे असताना देखील काल केमिकल घेवून जाणारा ट्रकचा टायर फुटला आणि ट्रकला झटक्यातच भीषण आगीने घेरलं. मिळालेल्या माहितीनुसार, या ट्रकमधील चालक आणि मालक दोघेही सुखरुप आहे. भीषण आगीक कोणतीही जीवितहानी झालेली नाही. सोशल मीडियावर हा संदर्भात व्हिडिओ व्हायरल होत आहे.

नाशिकहून नागपूरला जाणाऱ्या ट्रकचा मागील टायर अचानक फुटला त्यानंतर गाडी अनियंत्रित झाल्याने पुढे जावून डीव्हाडरला धडकली. धडक जोरात असल्यामुळे गाडीला अचानक आग लागली. आग लागताच वेळीच ट्रक मधील चालक आणि मालक दोघेही गाडीतून उतरले. आणि गाडी पासून लांब उभे राहिले. गाडीला भीषण आग लागल्यामुळे रस्त्यावरील वाहतुक खोळंबळी. घटनेनंतर पोलीसांना आणि अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल झाल्या. या आगीत ट्रक संपुर्ण जळून खाक झाला आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement