'छगन भुजबळ सामाजिक स्वास्थ्य बिघडवण्याचे काम करत आहेत'; Sambhaji Chhatrapati यांचा हल्लाबोल
आज याच पार्श्वभूमीवर अंबड मध्ये
छगन भुजबळ सामाजिक स्वास्थ्य बिघडवण्याचे काम करत आहेत म्हणत Sambhaji Chhatrapati यांनी त्यांच्यावर हल्लाबोल केला आहे. 'X' वर पोस्ट करत त्यांनी 'सर्वसामान्य ओबीसी बांधवांचा मराठा समाजास कोणताही विरोध नसताना केवळ आपले राजकीय स्थान टिकवण्यासाठी दोन समाजांत नसलेली भांडणं लावण्याचं पाप करत आहेत. सरकारमधील एक मंत्री उघडपणे वेगळी भूमिका घेऊन जातीय तेढ निर्माण करत असेल तर सरकारची देखील हीच भूमिका आहे का ? हे स्पष्ट करावे अन्यथा छगन भुजबळ यांची मंत्री पदावरून हकालपट्टी करावी.' असं म्हटलं आहे. छगन भुजबळांनी मराठा आरक्षण आंदोलनवरून मनोज जरांगे यांच्यावर आज अंबड येथील सभेत टीका केली आहे. Aarakshan Bachao Elgar Sabha: OBC सभेच्या पार्श्वभूमीवर जालना मध्ये जमावबंदीचे आदेश .
पहा पोस्ट
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)