Mumbai: मद्यप्राशन करून विमानात गोंधळ घालणाऱ्या दोघांना सहार पोलिसांकडून अटक
दोघांवर IPC च्या कलम 336 आणि विमान नियमांच्या कलम 21,22 आणि 25 अंतर्गत मद्यधुंद अवस्थेत आणि क्रूसोबत गैरवर्तन केल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला.
दुबईहून मुंबईला (From Dubai to Mumbai) येणाऱ्या दोन प्रवाशांना मद्यप्राशन करून विमानात गोंधळ घातल्याच्या आरोपावरून मुंबईच्या (Mumbai) सहार पोलिसांनी (Sahar Police) दोन जणांना अटक केली आहे. इंडिगोकडून (Indigo) तक्रार आल्यानंतर एफआयआर (FIR) नोंदवण्यात आली. दत्तात्रेय बापर्डेकर आणि जॉन जॉर्ज डिसोझा अशी अटक केलेल्या प्रवाशांची नाव असल्याचे मुंबई पोलिसांनी सांगितले आहे. दोघांवर IPC च्या कलम 336 आणि विमान नियमांच्या कलम 21,22 आणि 25 अंतर्गत मद्यधुंद अवस्थेत आणि क्रूसोबत गैरवर्तन केल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला. दोघांनाही रीतसर अटक करण्यात आली पण कलमे जामीनपात्र असल्याने त्यांना पोलीस ठाण्यातूनच जामीन मंजूर करण्यात आला असून पुढील तपास सुरु करण्यात आला आहे.
पहा ट्विट -
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)