Rohit Pawar On VBA: वंचित बहुजन आघाडीकडून मनोज जरांगे पाटील यांच्याबद्दल मविआला प्रस्तावावर रोहित पवार यांची प्रतिक्रिया

याबातब विचारले असता आमदार रहित पवार यांनी सावध प्रतिक्रिया दिली.

Rohit Pawar | Twitter

मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांना लोकसभआ निवडणूक 2024 मध्ये उमेदवारी द्यावी असा प्रस्ताव वंचित बहुजन आघाडीने महाविकासआघाडीपुढे ठेवल्याची चर्चा आहे. याबाबत एका पत्राचा दाखला देत प्रसारमाध्यमांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (शरद पवार गट) आमार रोहित पवार यांना विचारले असता ते म्हणाले, बैठकीत झालेल्या चर्चेची मला कल्पना नाही. वंचित बहुजन आघाडीच्या (व्हीबीए) मागण्यांबाबतही मला काहीही कल्पना नाही. प्रकाश आंबेडकर हे मोठे आहेत. त्यामुळे त्यांनी नेमके काय विधान केले आहे, हे पहावे लागेल असेही ते म्हणाले.

व्हिडिओ

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)