Maharashtra RTE Admission 2023-24: शाळेत मोफत प्रवेशासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 मार्च, जाणून घ्या नियम

शाळेच्या एकुण संख्येपेक्षा 25 टक्के राखीव जागांवर आरटीई अंतर्गत दुर्बल आणि वंचित घटकातील विद्यार्थी प्रवेश मिळवता येतो.

दुर्बल आणि वंचित घटकातील विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या शिक्षणाचा अधिकार (Right to Education) या उपक्रमा अंतर्गत प्रवेशप्रक्रिया 1 मार्चपासून सुरु झाले असून 17 मार्चपर्यंत पालकांना आरटीई (RTE) पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करता येईल. शाळेच्या एकुण संख्येपेक्षा 25 टक्के राखीव जागांवर आरटीई अंतर्गत दुर्बल आणि वंचित घटकातील विद्यार्थी प्रवेश मिळवता येतो. वंचित घटकात अनुसुचित जाती, अनुसूचित जमाती, ओबीसी, व्हीजेएनटी, विशेष मागासप्रवर्ग तसेच दिव्यांग विद्यार्थांचा यामध्ये समावेश होतो. तर दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी कुटुंबांचे उत्पन्न 1 लाखांपेक्षा कमी असावे. यासोबतच रहिवासी पुरावा म्हणून रेशन कार्ड, आधार कार्ड, बँक पासबुक, गॅसचे बुक भाडेपट्टी कर पावती, विजेचे बिल पाण्याचे बिल आदीं कागदपत्रांची गरज लागेल.

पहा ट्विट

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement