सिंधुदुर्गमध्ये 50 हजार वर्षांपूर्वी तयार झालेलं अशनी विवर सापडल्याचा अभ्यासकांचा दावा
पुणे जिल्ह्यातल्या शिरुर इथल्या चांदमल ताराचंद वोरा महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉक्टर अतुल जेठे आणि सिंधुदुर्गातले प्राध्यापक डॉक्टर बाळकृष्ण लळीत यांनी हा दावा केला आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात 50 हजार वर्षांपूर्वी तयार झालेलं अशनी विवर सापडल्याचा दावा अभ्यासकांनी केला आहे. पुणे जिल्ह्यातल्या शिरुर इथल्या चांदमल ताराचंद वोरा महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉक्टर अतुल जेठे आणि सिंधुदुर्गातले प्राध्यापक डॉक्टर बाळकृष्ण लळीत यांनी हा दावा केला आहे. बेसाल्ट खडक असलेल्या भागातील हे एकमेव असे विवर असावे. अवकाशात फिरणाऱ्या छोट्या छोट्या खगोलीय वस्तू जेव्हा गुरुत्वाकर्षणाच्या कक्षेत येतात आणि जळून जातात तेव्हा त्यांना उल्का किंवा अशनी या नावांनी ओळखले जाते.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)