मुकेश अंबानी यांच्या घरासमोर घडलेल्या घटनेचे नाट्यरूपांतर; सचिन वाझे यांना अँटिलिया समोरील रस्त्यावर चालायला लावले
मुकेश अंबानी यांच्या घरासमोर सापडलेल्या बॉम्ब प्रकरणात चौकशी करत एनआयए आणि फोरेंसिक टीमने, निलंबित केलेले मुंबई एपीआय सचिन वाझे यांना शुक्रवारी घटनेचे नाट्यरूपांतर करण्यासाठी घटनास्थळी नेले
मुकेश अंबानी यांच्या घरासमोर सापडलेल्या बॉम्ब प्रकरणात चौकशी करत एनआयए आणि फोरेंसिक टीमने, निलंबित केलेले मुंबई एपीआय सचिन वाझे यांना शुक्रवारी घटनेचे नाट्यरूपांतर करण्यासाठी घटनास्थळी नेले. 25 फेब्रुवारीला याच ठिकाणी अँटिलियाच्या बाहेर स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ सापडली होती. सीसीटीव्ही फुटेजमध्ये या साइटवर एक संशयित व्यक्ती आढळली होती व ही व्यक्ती सचिन वाझे असल्याचा टीमला संशय आहे. त्यामुळे आता या नाट्यरूपांतरमध्ये सचिन वाझे यांना मुकेश अंबानी यांच्या घराबाहेरील रस्त्यावर चालायला लावले आहे. यामध्ये सीसीटीव्हीमध्ये दिसणाऱ्या व्यक्तीची चाल ही सचिन वाझे यांच्या सारखी आहे का, हे पाहण्यासाठी सचिन वाझे यांनी घटनास्थळी आणून त्याच व्यक्तीप्रमाणे चालायला लावले.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)