Pune Accident: पुणे हिंजवडीत डंपर खाली चिरडून दोन तरुणींचा जागीच मृत्यू
या तरुणी दुचाकीने चालल्या होत्या त्याच वेळी वडजाई नगर कॉर्नर येथे समोरून येणाऱ्या डंपर चालकाचा ताबा सुटल्यामुळे डंपर पलटी होऊन दुचाकीस्वार तरुणी चिरडल्या गेल्या.
पुण्यात झालेल्या एका भीषण अपघातात शहारतील दोन तरुणींनी आपले प्राण गमावले आहे. पुण्यातील हिंजवडी - माण रस्त्यावरील वडजाई नगर कॉर्नर येथे दुपारी पावणे चारच्या सुमारास रेडिमीक्सने भरलेला डंपर पलटी होऊन दुचाकीस्वार दोन तरुणी जागीच ठार झाल्या. या तरुणी दुचाकीने चालल्या होत्या त्याच वेळी वडजाई नगर कॉर्नर येथे समोरून येणाऱ्या डंपर चालकाचा ताबा सुटल्यामुळे डंपर पलटी होऊन दुचाकीस्वार तरुणी चिरडल्या गेल्या.
पाहा व्हिडिओ -
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)