Ratan Tata Passes Away: प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांचे निधन; वयाच्या 86 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

ते बरेच दिवस आजारी होते.

Ratan Tata (Photo Credits: Getty Images)

Passes Away: प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांचे निधन झाले आहे. वयाच्या 86 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते बरेच दिवस आजारी होते. आज मुंबईतील कँडी रुग्णालयात त्यांचे निधन झाले. टाटा सन्स या देशातील सर्वात मोठे व्यावसायिक ट्रस्टचे मानद अध्यक्ष रतन टाटा यांना, रक्तदाब अचानक कमी झाल्याने मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले. नंतर त्यांची तब्येत अचानक बिघडल्याने त्यांना अतिदक्षता विभागात (आयसीयू) हलवण्यात आले, तेथे त्यांचा मृत्यू झाला.

रतन टाटा यांनी भारतीय व्यावसायिक जगतात अत्यंत महत्त्वाचे योगदान दिले. रतन टाटा यांचा जन्म 28 डिसेंबर 1937 रोजी झाला. रतन टाटा 1991 मध्ये टाटा समूहाचे अध्यक्ष झाले आणि 2012 पर्यंत ते या पदावर होते. त्यांनी 1996 मध्ये टाटा सर्व्हिसेस आणि 2004 मध्ये टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस सारख्या कंपन्यांची स्थापना केली. त्यांना भारताचे दोन सर्वोच्च नागरी पुरस्कार, पद्मविभूषण (2008) आणि पद्मभूषण (2000) प्रदान करण्यात आले आहेत. टाटा समूहाला मोठ्या उंचीवर नेण्यात रतन टाटा यांची सर्वात मोठी भूमिका होती. त्यांनी देशासाठी आणि सर्वसामान्यांसाठी अशी अनेक कामे केली, ज्यासाठी ते सदैव स्मरणात राहतील. रतन टाटा हे एक उदार व्यक्ती होते आणि संकटाच्या वेळी देशाला मदत करण्यासाठी सदैव तत्पर असायचे. (हेही वाचा: Pune News: Garba King अशोक माळी यांचा गरबा खेळताना मृत्यू; घटना कॅमेऱ्यात कैद)

रतन टाटा यांचे निधन-

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)