रणजितसिंह डिसले गुरुजींचा अध्ययन रजेचा अर्ज मंजूर; मानले वर्षा गायकवाड आणि बच्चू कडू यांचे आभार
ग्लाेबल पुरस्कार विजेते रणजितसिंह डिसले गुरुजी यांना परदेशातील स्कॉलरशीप मिळाली आहे
ग्लाेबल पुरस्कार विजेते रणजितसिंह डिसले गुरुजी यांना परदेशातील स्कॉलरशीप मिळाली आहे. त्यासाठी त्यांना तिकडे शिक्षणासाठी जायचे आहे व म्हणून त्यांनी रजेसाठी अर्ज दाखल केला होता. मात्र, रितसर शिक्षण विभागाकडून प्रस्ताव येऊ द्या, मंजुरी देता येईल, असे त्यांना सांगण्यात आले. त्यानंतर डिसले गुरुजी यांचा प्रशासनाकडून छळ होत असल्याचा आरोप झाला होता. आता डिसले गुरुजी यांचा रजेचा अर्ज मंजूर झाल्याची माहिती मिळत आहे. त्यांनी ट्वीट करत माहिती दिली की, 'सोलापूर जिल्हा परिषदेचे CEO दिलीप स्वामी साहेबांनी अध्ययन रजेचा अर्ज मंजूर केला आहे. माननीय वर्षा गायकवाड मॅडम, आदरणीय बच्चू कडू साहेब, यांच्यासह सर्व प्रशासकीय यंत्रणेचे आभार व्यक्त करतो.'
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Sansad Ratna Awards 2025: संसद रत्न पुरस्कारांची घोषणा; 17 विजेत्यांमध्ये महाराष्ट्रातील सुप्रिया सुळे, अरविंद सावंत, वर्षा गायकवाडसह 7 खासदारांचा समावेश
Retired ACP Rajkumar Gaikwad Dies of Heart Attack: सिंहगड किल्ल्यावर ट्रेकिंग करताना निवृत्त एसीपी राजकुमार गायकवाड यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
Vikram Gaikwad Passes Away: राष्ट्रीय पुरस्कार विजेते मेकअप आर्टिस्ट विक्रम गायकवाड यांचे निधन
KKR vs CSK T20 Stats In TATA IPL: कोलकाता नाईट रायडर्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांची एकमेकांविरुद्ध अशी आहे कामगिरी; दोन्ही संघांचे हेड टू हेड रेकॉर्ड पहा
Advertisement
Advertisement
Advertisement