Raksha Bandhan 2023: कमर मोहसीन शेख पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बांधणार हाताने बनवलेली राखी

यावर्षी ही महिला पंतप्रधानांना हाताने बनवलेली राखीही पाठवत आहे.

कमर मोहसीन शेख ही भारतीय वंशाची पाकिस्तानी महिला गेल्या 27 वर्षांपासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दरवर्षी राखी पाठवत आहे. यावर्षी ही महिला पंतप्रधानांना हाताने बनवलेली राखीही पाठवत आहे. याबद्दल बोलताना या महिलेने म्हटले आहे की, " मी स्वतः 'राखी' बनवली आहे. पाठिमागील 2-3 वर्षांमध्ये कोविड संकटामुळे त्यांना भेटता आले नाही. पण, या वेळी मी त्यांना प्रत्यक्ष भेटेन. शिवाय त्यांना (पीएम मोदी) वाचनाची आवड असल्याने शेतीवरील एक पुस्तकही त्यांना भेट देईन. कमर मोहसीन शेख यांना मोदींच्या भगिणी म्हणून ओळखले जाते.

ट्विट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)