'राज्यात कायदा-सुव्यवस्था बिघडल्यास त्याची जबाबदारी ही राज ठाकरेंची असेल'; खासदार Arvind Sawant यांची प्रतिक्रिया

राज ठाकरे म्हणाले, 'मी तमाम हिंदूंना आवाहन करतो की उद्या, 4 मे ला लाऊडस्पीकरवरून अजान वाजवताना दिसली तर त्या ठिकाणी लाऊडस्पीकरवर हनुमान चालीसा वाजवून उत्तर द्या.'

Arvind Sawant | Photo Credits: ANI)

महाराष्ट्रात लाऊडस्पीकरचा वाद वाढत चालला आहे. एफआयआर आणि अटकेच्या टांगत्या तलवारीच्या पार्श्‍वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अजानचे उत्तर हनुमान चालिसा वाजवून दिले पाहिजे, असे म्हटले आहे. त्यांनी ट्विट करत उद्या सर्व नागरिकांना हिंदूची ताकद दाखवण्यास सांगितले. राज ठाकरे म्हणाले, 'मी तमाम हिंदूंना आवाहन करतो की उद्या, 4 मे ला लाऊडस्पीकरवरून अजान वाजवताना दिसली तर त्या ठिकाणी लाऊडस्पीकरवर हनुमान चालीसा वाजवून उत्तर द्या.

यावर शिवसेनेचे खासदा अरविंद सावंत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ‘ते म्हणाले की, ‘लाऊडस्पीकरबाबत सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय ग्राह्य धरला जात आहे. जर का त्याबाबत समस्या असेल तर केंद्राला पत्र लिहून भोंग्यांबाबत कायदा करायला सांगा. सर्वोच्च न्यायालयाचे निर्णय सर्वांसाठी लागू होतो. सध्या जाणीवपूर्वक दंगे घडवून महाराष्ट्रात अस्थिरता निर्माण करण्याचा प्रयत्न चालू आहे. राज्यात कायदा-सुव्यवस्था बिघडल्यास त्याची जबाबदारी ही राज ठाकरेंची असेल.’

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)