Lok Sabha Elections 2024: ‘राज ठाकरे-पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकसभा निवडणुकींच्या दरम्यान एका व्यासपीठावर दिसणार असल्याच्या' चर्चांना राज ठाकरे यांनी लावला पूर्णविराम; पहा खुलासा!
अनौपचारिक गप्पा या अनौपचारिकच ठेवायच्या असतात आणि त्यात न केलेली विधानं तोंडात कोंबायची नसतात हा संकेत असतो. असे राज ठाकरेंनी स्पष्ट केले आहे.
लोकसभा निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर आता देशात युत्या आणि आघाडींची नवनवी समिकरणं दिसत आहेत. महाराष्ट्रातही महायुतीला मनसे कडून बिनशर्त पाठिंबा देण्यात आला आहे. त्यानंतर अमित ठाकरेंच्या अनौपचारिक गप्पांचा दाखला देत एका वृत्तवाहिनीने राज ठाकरे-पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकसभा निवडणुकींच्या दरम्यान एका व्यासपीठावर दिसणार असल्याची चर्चा सुरू केली आहे. मात्र या वृत्तातील दावा राज ठाकरेंनी स्पष्ट फेटाळला आहे. याबाबाबत X वर पोस्ट लिहित त्यांनी खुलासा केला आहे.
काल एका वृत्तवाहिनीवर, अमितशी झालेल्या अनौपचारिक गप्पांचा दाखला देत, ‘राज ठाकरे आणि पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी हे लोकसभा निवडणुकींच्या दरम्यान एका व्यासपीठावर दिसणार अशी बातमी चालवली.
मुळात अमितने असं कोणतंही विधान केलेलं नाही. अमित काल पुण्याच्या दौऱ्यावर होता आणि तिथे…
— Raj Thackeray (@RajThackeray) April 18, 2024
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Apr 18, 2024 08:37 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

