Raj Thackeray Birthday: मिठाई, पुष्पगुच्छ नको शैक्षणिक साहित्य, झाडाचं रोप वाढदिवसाची भेट म्हणून आणा; मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचं मनसैनिकांना आवाहन
असं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा 14 जून दिवशी वाढदिवस आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त राज्याच्या कानाकोपर्यातून कार्यकर्ते त्यांना भेटायला येतात. अशावेळी अनेकदा त्यांच्याकडून मिठाई, पुष्पगुच्छ आणले जतात. पण त्याऐवजी यंदा शैक्षणिक साहित्य, झाडाचं रोप आणण्याचं आवाहन त्यांनी केलं आहे. जे काही शैक्षणिक साहित्य भेटवस्तू म्हणून आणाल ते गरजू विद्यार्थ्यांना आपल्या पक्षाकडून भेट म्हणून देऊ. असे त्यांनी सांगितलं आहे. राज ठाकरे 14 जूनला कार्यकर्त्यांना त्यांच्या राहत्या घरी सकाळी 8.30 ते दुपारी 12 वाजे पर्यंत भेटतील असं सांगण्यात आलं आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)