Raj Thackeray Aurangabad Rally: राज ठाकरे घेणार मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रासह राज्यभर सभा; औरंगाबादच्या सभेत घोषणा

संभाजीनगर हा महाराष्ट्राचा मध्य आहे. यापुढील माझ्या सर्व सभा मराठवाड्यातील प्रत्येक जिल्ह्यात होणार आहेत

Raj Thackeray | (Photo Credits: Twitter)

राज ठाकरे पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या राजकारणात सक्रिय भूमिका बजावण्याच्या तयारीत आहेत. यावेळी त्यांनी मशिदींतील लाऊडस्पीकर हटवण्याचा मुद्दा उपस्थित केला आहे. महाराष्ट्राच्या स्थापना दिनानिमित्त राज ठाकरे यांनी औरंगाबादमध्ये मोठी रॅली आयोजित केली आहे. सध्या इथल्या सभेला ते संबोधित करत आहेत. यावेळी त्यांनी सांगितले की, संभाजीनगर हा महाराष्ट्राचा मध्य आहे. यापुढील माझ्या सर्व सभा मराठवाड्यातील प्रत्येक जिल्ह्यात होणार आहेत. यासह विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, कोकण अशा राज्यातील विविध भागात सभा होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement