मुंबई मध्ये पहिली बंडखोरी रोखण्यात भाजपाला यश; राज पुरोहित यांनी घेतली माघार
पण त्यांची नाराजी दूर करण्यात देवेंद्र फडणवीस यांना यश आले आहे.
महायुतीमध्ये भाजपा ने 99 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. या यादीमध्ये कुलाबा मधून राहुल नार्वेकर यांना उमेदवारी जाहीर केली आहे. यावरून राज पुरोहित नाराज झाले होते. पण त्यांची नाराजी दूर करण्यात देवेंद्र फडणवीस यांना यश आले आहे. आज राहुल नार्वेकरांसोबत पत्रकार परिषद घेत त्यांनी आपण सारी ताकद महायुतीसाठी लावणार असल्याचं म्हटलं आहे. दरम्यान महायुतीत तिकीट कापल्याने माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी देखील दिल्ली गाठल्याचं पहायला मिळालं आहे.
राज पुरोहित यांची नाराजी दूर
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)