Rain-Related Deaths in Marathwada: यंदा मराठवाड्यात पावसाशी संबंधित घटनांमध्ये 64 जणांचा मृत्यू; विजेच्या धक्क्याने 38 लोकांनी गमावला जीव

अहवालात म्हटले आहे की, ज्या लोकांनी आपला जीव गमावला, त्यापैकी 24 जण पुरात बुडाले. या प्रदेशात शेतकऱ्यांच्या 1,595 जनावरांचा मृत्यू झाला आहे.

Lightning | Representational image (Photo Credits: pixabay)

Rain-Related Deaths in Marathwada: महाराष्ट्राच्या मराठवाड्यात यावर्षीच्या पावसाळ्यात पावसाशी संबंधित घटनांमध्ये तब्बल 64 लोकांचा मृत्यू झाला, त्यापैकी 38 जणांचा मृत्यू विजेच्या धक्क्याने झाला आहे. अधिकाऱ्यांनी गुरुवारी याबाबत माहिती दिली. मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, लातूर, नांदेड, उस्मानाबाद आणि हिंगोली या जिल्ह्यांचा समावेश होतो. या मृत्यूंपैकी 1 जून ते 4 ऑक्टोबर दरम्यान, लातूरमध्ये सर्वाधिक 12 मृत्यू झाले आहेत, असे महसूल विभागाच्या अहवालात म्हटले आहे. मराठवाड्यात पावसाशी संबंधित घटनांमध्ये 16 जण जखमी झाले आहेत.

अहवालात म्हटले आहे की, ज्या लोकांनी आपला जीव गमावला, त्यापैकी 24 जण पुरात बुडाले. या प्रदेशात शेतकऱ्यांच्या 1,595 जनावरांचा मृत्यू झाला आहे. आठ जिल्ह्यांपैकी परभणीत सर्वाधिक 407 मृत्यू झाले आहेत. सध्या, प्रदेशात 407 लाइटनिंग अरेस्टर्स बसवण्यात आले आहेत, त्यापैकी 308 बीडमध्ये आणि 79  छत्रपती संभाजीनगरमध्ये असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. (हेही वाचा; Nashik: नाशिकमध्ये फायरिंग ट्रेनिंग दरम्यान स्फोट; दोन अग्निवीर जवानांचा मृत्यु)

मराठवाड्यात पावसाशी संबंधित घटनांमध्ये 64 जणांचा मृत्यू-

 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now