Rahul Shewale Mother Passes Away: खासदार राहुल शेवाळे यांना मातृशोक; CM Eknath Shinde यांनी घेतलं अंत्यदर्शन
शिवसेना खासदार आणि पक्षाचे लोकसभेतील गटनेते खासदार राहुल शेवाळे यांच्या मातोश्री जयश्री रमेश शेवाळे यांचे काल रात्री हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं आहे.
खासदार राहुल शेवाळे यांना मातृशोक झाला आहे. खासदार राहुल शेवाळे यांच्या मातोश्री जयश्री रमेश शेवाळे यांचे काल रात्री हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यानंतर आज चेंबूर येथील साई रुग्णालयात जाऊन त्यांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अंत्यदर्शन घेतले आहे. दक्षिण मध्य मुंबई मतदारसंघामधून राहुल शेवाळे हे खासदार आहेत. जयश्री शेवाळे 73 वर्षीय होत्या. त्या आजारी होत्या. नुकताच त्यांना डिस्चार्ज देण्यात आला होता. काल रात्री त्यांना घरीच हृद्यविकाराचा झटका आला आणि त्यामध्ये त्यांचे निधन झाले.
पहा ट्वीट
शिवसेना खासदार आणि पक्षाचे लोकसभेतील गटनेते खासदार राहुल शेवाळे यांच्या मातोश्री जयश्री रमेश शेवाळे यांचे काल रात्री हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं. आज चेंबूर येथील साई रुग्णालयात जाऊन त्यांचे अंत्यदर्शन घेतले. तसेच शेवाळे कुटूंबियांचे सांत्वन केले.
यावेळी खासदार राहुल… pic.twitter.com/0CS6M9W3fc
— Eknath Shinde - एकनाथ शिंदे (@mieknathshinde) November 20, 2023
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Nov 20, 2023 02:42 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

