Pune: संतप्त शिवसैनिकांकडून Uday Samant यांच्या गाडीवर हल्ला; केली 'गद्दार-गद्दार' अशी घोषणाबाजी (Watch Video)

संतप्त शिवसैनिकांनी त्यांची गाडी अडवून त्यावर हल्ला केला. या हल्ल्यात सामंत यांच्या गाडीची मागची काच फुटली

उदय सामंत यांच्या गाडीवर हल्ला (संग्रहित संपादित प्रतिमा)

पुण्यातील कात्रज जवळ राज्याचे माजी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या गाडीवर शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केला आहे. सामंत हे आमदार तानाजी सावंत यांच्या घरी जात असताना हा हल्ला झाला. आदित्य ठाकरे हे सध्या पुण्या दौऱ्यावर आहेत व त्यांची आज कात्रज येथे सभा होती. आदित्य ठाकरेंची सभा संपवून जेव्हा शिवसैनिक परतत होते, त्याचवेळी उदय सामंत यांची गाडी तिथून जात होती. यावेळी संतप्त शिवसैनिकांनी त्यांची गाडी अडवून त्यावर हल्ला केला. या हल्ल्यात सामंत यांच्या गाडीची मागची काच फुटली. यावेळी शिवसैनिकांकडून 'गद्दार-गद्दार' अशी घोषणाबाजीही करण्यात आली. यावेळी परिसरात मोठा गदारोळ माजला होता.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement