Pune: धक्कादायक! मटणाच्या सूपमध्ये भाताचे कण आढळल्याने हाॅटेल कर्मचाऱ्याची हत्या, दोन्ही आरोपी फरार (Watch Video)

मंगेश पोस्टे या कर्मचाऱ्यांच्या डोक्याला मार लागल्याने त्याचा मृत्यू झाला, अशी माहिती सहायक पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांनी दिली.

प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credits: PTI)

पुण्यातील (Pune) पिंपळे सौदागर परिसरात धक्कादायक घटना घडली आहे. मटणाच्या सूपमध्ये भाताचे कण आल्याने मद्यधुंद अवस्थेत असलेल्या आरोपींना राग आला आणि त्यांनी हॅाटेल कर्मचाऱ्यांवर हल्ला केला आणि त्याची हत्या (Murder) करण्यात आली. पोलिसांच्या माहितीनुसार हे दोघे फरार असल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले. मंगेश पोस्टे या कर्मचाऱ्यांच्या डोक्याला मार लागल्याने त्याचा मृत्यू झाला, अशी माहिती सहायक पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांनी दिली. यातील एका आरोपीचे नाव विजय वाघिरे असे असून दुसऱ्या आरोपीचे नाव समजू शकले नाही. दोन्ही आरोपींविरुद्ध कलम 302 अन्वये खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांचा शोध सुरू आहे, असे त्यांनी सांगितले.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)