Pune: धक्कादायक! मटणाच्या सूपमध्ये भाताचे कण आढळल्याने हाॅटेल कर्मचाऱ्याची हत्या, दोन्ही आरोपी फरार (Watch Video)
पोलिसांच्या माहितीनुसार हे दोघे फरार असल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले. मंगेश पोस्टे या कर्मचाऱ्यांच्या डोक्याला मार लागल्याने त्याचा मृत्यू झाला, अशी माहिती सहायक पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांनी दिली.
- Read in
- मराठी
पुण्यातील (Pune) पिंपळे सौदागर परिसरात धक्कादायक घटना घडली आहे. मटणाच्या सूपमध्ये भाताचे कण आल्याने मद्यधुंद अवस्थेत असलेल्या आरोपींना राग आला आणि त्यांनी हॅाटेल कर्मचाऱ्यांवर हल्ला केला आणि त्याची हत्या (Murder) करण्यात आली. पोलिसांच्या माहितीनुसार हे दोघे फरार असल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले. मंगेश पोस्टे या कर्मचाऱ्यांच्या डोक्याला मार लागल्याने त्याचा मृत्यू झाला, अशी माहिती सहायक पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांनी दिली. यातील एका आरोपीचे नाव विजय वाघिरे असे असून दुसऱ्या आरोपीचे नाव समजू शकले नाही. दोन्ही आरोपींविरुद्ध कलम 302 अन्वये खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांचा शोध सुरू आहे, असे त्यांनी सांगितले.
पुणे : जेवताना मटणाच्या सुपात भाताचे कण, बेदम मारहाणीत वेटरचा मृत्यू pic.twitter.com/1pJ1WNh5x1
— Maharashtra Times (@mataonline) November 17, 2022
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Nov 17, 2022 09:40 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

