Pune Shocker: अश्लील व्हिडिओ दाखवून स्वतःच्या 11 वर्षीय मुलीवर बलात्कार; आरोपी वडिलाला अटक, पुण्यातील धक्कादायक घटना
त्यानंतर शाळेच्या मुख्याध्यापकांनी पोलिसांशी संपर्क साधला.
पुणे पोलिसांनी एका 35 वर्षीय व्यक्तीला त्याच्या 11 वर्षांच्या मुलीवर बलात्कार केल्याच्या आरोपाखाली अटक केली आहे. एका अधिकाऱ्याने गुरुवारी याबाबत माहिती दिली. पोलिसांनी सांगितले की, मुलगी शिकत असलेल्या शाळेच्या प्रशासनाला अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याची माहिती मिळाल्यानंतर ही घटना उघडकीस आली. त्यानंतर शाळेच्या मुख्याध्यापकांनी पोलिसांशी संपर्क साधला आणि भारतीय न्याय संहिता (BNS) तसेच लैंगिक अपराधांपासून मुलांचे संरक्षण (POCSO) कायद्यांतर्गत वडिलांविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला. त्याला बुधवारी अटक करण्यात आली. वारजे पोलीस ठाण्यातील एका अधिकाऱ्याने सांगितले की, आरोपी त्याच्या मुलीला अश्लील व्हिडिओ दाखवत असे आणि तिच्यावर बलात्कार करत असे. पोलीस उपायुक्त (झोन 3) संभाजी कदम यांनी सांगितले की, आरोपीला बुधवारी न्यायालयात हजर केले असता त्याला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. (हेही वाचा:
अश्लील व्हिडिओ दाखवून स्वतःच्या 11 वर्षीय मुलीवर बलात्कार-
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)