Pune Shocker: पुण्यातील स्वारगेट बस स्टँडवर बसमध्ये 26 वर्षीय महिलेवर बलात्कार; आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल, तपास सुरु

या प्रकरणी पुणे शहर पोलिसांनी दत्तात्रय रामदास गाडे नावाच्या व्यक्तीविरुद्ध स्वारगेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. सध्या आरोपी फरार असून, आरोपीला पकडण्यासाठी पथके तयार करण्यात आली आहेत.

Photo Credit- X

महाराष्ट्रातील पुणे शहरातील वर्दळीच्या स्वारगेट बस स्टँडवर उभ्या असलेल्या राज्य परिवहन बसमध्ये, एका 26 वर्षीय महिलेवर एका पुरूषाने बलात्कार केल्याचा आरोप आहे. यानंतर तो फरार झाला. सध्या महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी त्याचा शोध सुरू केला आहे. एका पोलीस अधिकाऱ्याने ही माहिती एका वृत्तसंस्थेला दिली. या प्रकरणी पुणे शहर पोलिसांनी दत्तात्रय रामदास गाडे नावाच्या व्यक्तीविरुद्ध स्वारगेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. सध्या आरोपी फरार असून, आरोपीला पकडण्यासाठी पथके तयार करण्यात आली आहेत. महिलेच्या म्हणण्यानुसार, मंगळवारी पहाटे 5.30 वाजता ती एका प्लॅटफॉर्मवर पैठणला जाणाऱ्या बसची वाट पाहत असताना, एक माणूस तिच्याकडे आला आणि म्हणाला की बस दुसऱ्या प्लॅटफॉर्मवर आली आहे. यानंतर तो तिला स्टेशन परिसरात एका निर्जन ठिकाणी उभ्या असलेल्या रिकाम्या बसमध्ये घेऊन गेला. महिलेने सांगितले की त्याने येथे तिच्यावर बलात्कार केला आणि नंतर तेथून पळून गेला. अधिकाऱ्याने सांगितले की, पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजवरून आरोपीची ओळख पटवली आहे आणि त्याला पकडण्यासाठी अनेक पथके तयार करण्यात आली आहेत. लवकरच त्याला अटक केली जाईल. (हेही वाचा: Palghar Shocker: वाढदिवसाच्या पार्टीत 16 वर्षीय अल्पवयीन तरुणीवर अंमली पदार्थ पाजून बलात्कार, प्रियकरावर गुन्हा दाखल)

पुण्यातील स्वारगेट बस स्टँडवर बसमध्ये 26 वर्षीय महिलेवर बलात्कार-

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now