Pune Rains: पुणे जिल्हाधिकार्‍यांच्या विनंतीवरून एकता नगर भागामध्ये लष्कराची तुकडी तैनात

मुठा नदीत पाण्याची पातळी वाढल्याने एकता नगर येथील द्वारका इमारतीच्या बेसमेंट पार्किंगमध्ये पाणी शिरले.

Ekta Nagar | X

सततचा मुसळधार पाऊस आणि खडकवासला धरणातून अतिरिक्त पाणी सोडल्यानंतर, जिल्हा दंडाधिकाऱ्यांच्या विनंतीवरून एकता नगर परिसरात लष्कराची तुकडी तैनात करण्यात आली आहे. यामध्ये इंजिनिअर्स आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांसह सुमारे 100 कर्मचारी, आवश्यक वाहने आणि पुरवठा यांनी सुसज्ज ठेवण्यात आल्याची माहिती भारतीय लष्कर कडून देण्यात आली आहे. मुठा नदीत पाण्याची पातळी वाढल्याने एकता नगर येथील द्वारका इमारतीच्या बेसमेंट पार्किंगमध्ये पाणी शिरले. घटनास्थळी लष्कराचे जवान आणि पुणे अग्निशमन दलाचे जवान दाखल आहेत. Pune Rains: खडकवासला धरणातून 35,000 लीटर पाण्याचा विसर्ग; नागरिकांचे स्थलांतर सुरू (Watch Video). 

पहा पोस्ट

द्वारका इमारतीच्या बेसमेंट पार्किंगमध्ये पाणी

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now