Pune: पुणे महापालिकेने एफसी रोडवरील L3 बारमधील अनधिकृत बांधकामावर चालवला हातोडा; ड्रग पार्टी झाल्याचा आरोप (Watch Video)

एफसी रोडवरील या लिक्विड लीझर लाउंज (L3) बारमध्ये ड्रग पार्टी झाल्याचा प्रकार उघडकीस आला होता. याबाबत पोलिसांनी सोमवारी सकाळी बारच्या दोन मालकांपैकी एक आणि इतर सात जणांना अटक केली.

L3 Bar on FC Road

पुणे महापालिकेने पुण्यातील एफसी रोडवरील प्रसिद्ध L3 बारमधील अनधिकृत बांधकाम पाडले. पुणे शहराला अमली पदार्थमुक्त करण्यासाठी बेकायदेशीर पब्जवर कठोर कारवाई करावी. तसेच अमली पदार्थांशी निगडित अवैध बांधकामांवर बुलडोझर फिरवावा, असे स्पष्ट निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुणे पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांना दिले आहेत. त्यानंतर आता ही कारवाई करण्यात आली. दुसरीकडे एफसी रोडवरील या लिक्विड लीझर लाउंज (L3) बारमध्ये ड्रग पार्टी झाल्याचा प्रकार उघडकीस आला होता. याबाबत पोलिसांनी सोमवारी सकाळी बारच्या दोन मालकांपैकी एक आणि इतर सात जणांना अटक केली. हा बार रात्री 1,30 नंतरही सुरु असल्याच्या तक्रारी आल्या होत्या. (हेही वाचा: Mumbai Hoarding Collapse: घाटकोपर होर्डिंग घटनेबाबत शिंदे सरकारची मोठी कारवाई; आयपीएस Quaiser Khalid निलंबित)

पहा व्हिडिओ- 

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement