AR Rahman Concert Stopped In Pune: पुणे पोलिस अॅक्शन मोडमध्ये! प्रसिद्ध संगीतकार एआर रहमान यांचा कार्यक्रम केला बंद; Watch Video

या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Pune Police Stopped AR Rahman's show (PC - Twitter/@zee24taasnews)

AR Rahman Concert Stopped In Pune: पुणे पोलिसांनी प्रसिद्ध संगीतकार एआर रहमान (AR Rahman) ला चांगलेच खडेबोल सुनावले आहेत. रविवारी संध्याकाळी एआर रहमान यांचा राजाबहाद्दूर मिल परिसरातील कार्यक्रम 10 नंतरही सुरू होता. अखेर पोलिसांनी अॅक्शन मोडमध्ये येऊन स्टेजवर जाऊन एआर रहमान यांचा कार्यक्रम बंद केला. तसेच संगीतकाराला कार्यक्रमाच्या वेळेवरून फटकारले. दरम्यान, एआर रहमान कोणताही वाद न घालता कार्यक्रमातून निघून गेले. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यात पोलिस स्टेजवर जाऊन कार्यक्रम बंद करण्याबाबत सूचना देताना दिसत आहेत. (हेही वाचा - Sharad Pawar: शरद पवारांनी सिनेमागृहात जाऊन पाहिला ‘महाराष्ट्र शाहीर’ चित्रपट, अंकुश चौधरीच्या अभिनयाचे केले कौतुक)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)