Power Outage In Pune: पुणे, पिंपरी चिंचवड पहाटेपासून वीज खंडित, वीज पुरवठा करणाऱ्या टॉवर लाईनमध्ये बिघाड

कोथरूड, शिवाजीनगरचा काही भाग वगळता पुणे शहर, पिंपरी व चिंचवड शहर तसेच चाकण एमआयडीसी, लोणीकंद, वाघोली परिसरात सकाळी 6 वाजल्यापासून वीज पुरवठा खंडित झाला आहे.

Representational Image (Photo credits: PTI)

महापारेषणच्या लोणीकंद व चाकण या दोन्ही महत्वाच्या 400 केव्ही अतिउच्च दाबाच्या उपकेंद्रांना वीज पुरवठा करणाऱ्या टॉवर लाईनमध्ये 5 ठिकाणी बुधवारी पहाटे 4.30च्या सुमारास बिघाड झाला. त्यामुळे कोथरूड, शिवाजीनगरचा काही भाग वगळता पुणे शहर, पिंपरी व चिंचवड शहर तसेच चाकण एमआयडीसी, लोणीकंद, वाघोली परिसरात सकाळी 6 वाजल्यापासून वीज पुरवठा खंडित झाला आहे. अतिशय दाट धुके व दवं यामुळे या टॉवर लाईन मध्ये बिघाड झाल्याची शक्यता असल्याचे महापारेषणकडून सांगण्यात आले आहे. पुण्यातील वीज सकाळी 11 वाजेपर्यंत पूर्ववत होण्याची शक्यता आहे.

Tweet

 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)