Pune Metro Extends Operating Hours: गणेशोत्सवात पुणेकरांना दिलासा! मेट्रोची प्रवासी सेवा मध्यरात्रीपर्यंत चालवण्यात येणार, जाणून घ्या वेळा
पुणे मेट्रोने आपल्या दोन्ही मार्गांवर- पिंपरी-चिंचवड महानगरपालिका (PCMC) ते दिवाणी न्यायालय आणि वनाझ ते रामवाडी, कामकाजाचे तास वाढवले आहेत.
Pune Metro Extends Operating Hours: गणेशोत्सवामध्ये पुणेकरांसाठी एक दिलासादायक बाब समोर आली आहे. पुणे मेट्रोने आपल्या दोन्ही मार्गांवर- पिंपरी-चिंचवड महानगरपालिका (PCMC) ते दिवाणी न्यायालय आणि वनाझ ते रामवाडी, कामकाजाचे तास वाढवले आहेत. उद्या, 7 ते 9 सप्टेंबरपर्यंत पुणे मेट्रो दररोज 17 तास म्हणजेच सकाळी 6 ते रात्री 11 वाजेपर्यंत सुरू राहणार आहे. 10 ते 16 सप्टेंबरपर्यंत प्रवाशांना सकाळी 6 ते मध्यरात्री या वेळेत मेट्रो सेवा वापरता येणार आहे. पुणे मेट्रो अनंत चतुर्दशीला, 17 सप्टेंबर रोजी सकाळी 6 ते 18 सप्टेंबर रोजी सकाळी 6 वाजेपर्यंत पूर्ण 24 तास धावेल. त्यानंतर 8 सप्टेंबरपासून, मेट्रो सकाळी 6 ते रात्री 10 या वेळेत पूर्ववत होईल. या वाढीव सेवा तासांमुळे पुणे मेट्रोच्या महसुलात गतवर्षीप्रमाणे लक्षणीय फायदा होईल अशी अपेक्षा आहे.
पुणे मेट्रोने त्यांच्या अधिकृत X (पूर्वीचे ट्विटर) हँडलवर लिहि, ‘गणेशोत्सवाच्या काळात गणेश मंडळांचे देखावे बघण्यासाठी नागरिक मोठ्याप्रमाणावर शहराच्या मध्य भागात येत असतात. नागरीकांच्या सुविधेसाठी मेट्रोच्या वेळात बदल करून मेट्रोची प्रवासी सेवा मध्यरात्रीपर्यंत चालवण्यात येणार आहे. तसेच मेट्रो फेऱ्यांच्या संख्येतही वाढ करण्यात येणार आहे. प्रवाशांनी या सेवेचा लाभ घ्यावा.’ (हेही वाचा: Pune Traffic Restrictions: गणेशोत्सवादरम्यान पुण्यातील प्रमुख रस्त्यांवर 24/7 जड वाहन बंदी; वाहतूक पोलिसांनी जारी केले निर्बंध)
पुणे मेट्रोची प्रवासी सेवा मध्यरात्रीपर्यंत चालवण्यात येणार-
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)