Pune Koyta Gang: कोयता गँगचीने रात्री वाहनांची केली तोडफोड, पुण्यात नेमकं चाललं तरी काय? (पाहा व्हिडिओ)
ही घटना शनिवारी हडपसर येथील वसंतददादा इन्स्टिट्यूट जवळ ही घटना घडली आहे.
Pune Koyta Gang: पुण्यातील हडपसर येथे कोयत्या गॅंगने रात्री वाहनांची तोडफोड केली आहे. ही घटना शनिवारी हडपसर येथील वसंतददादा इन्स्टिट्यूट जवळ ही घटना घडली आहे. या प्रकरणी नागरिकांच्या तक्रारीनुसार पोलिसांनी चौघांवर गुन्हा दाखल केला आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. व्हिडिओत दिसल्याप्रमाणे, 8 ते 10 जणांनी कोयत्या हातात घेऊन वाहनांची तोडफोड केली आहे. कोयत्या गॅंगमुळे नागरिकांमध्ये दहशत पसरली आहे. गेल्या काही वर्षांपासून कोयत्या गॅंगने लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण केले आहे. दरम्यान नागरिकांनी पोलिसांसमोर सुरक्षतेचा प्रश्न उभा केला आहे. (हेही वाचा- पुण्यात कोयता गॅंगचा धुमाकुळ, भर दिवसा तरुणावर कोयत्याने वार, पोलीस ठाण्यात टोळक्यांविरुध्दात गुन्हा दाखल
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)