Pune Fire: पुण्यात खेड शिवापूर मध्ये पेंट कंपनी मध्ये भडकली आग; अग्निशमन दल घटनास्थळी दाखल

Fire | Representational Image | (Photo Credits: Pixabay)

पुण्यात खेड शिवापूर मध्ये पेंट कंपनीला आग लागली आहे. PMRDA fire brigade कडून आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाचे कर्मचारी काम करत आहेत. आग पसरू नये म्हणून प्रयत्न सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. रंगाची कंपनी असल्याने इथे ज्वलनशील पदार्थ होते आणि आग भडकत गेली आहे. सध्या या कंपनीच्या आजुबाजूच्या दोन कंपनींना देखील आगीने कवेत घेतले आहे. धुराचे प्रचंड लोळ उठत असल्याने परिसरात भीतीचे वातावरण आहे.

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)